चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे काल झालेल्या तालुका स्तरावरील बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याचे विधानसभा अध्यक्ष मारुती पाथरवट यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नुकताच झालेल्या बैठकीत चंदगड नगर पंचायतच्या पहिल्या निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारांना पक्षाच्या वतीने निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला असे पाथरवट यांनी सांगितले. तालुका अध्यक्ष उत्तम पाटील, शहर प्रमुख प्रकाश साबळे, सरचिटणीस विजय कांबळे, दत्ता सलामवाडकर,चन्नापा गावडे, गीतांजली सुतार, संगीता चंदगडकर, सरीता कांबळे, तनुजा गावडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment