![]()  | 
| कोनाळ खळग्यातील धरणाच्या गेटचे काम बोगस पध्दतीने केले त्यामुळे दोन दरवाज्यातून मोठ्या प्रमाणावर गळती. | 
दोडामार्ग / प्रतिनिधी
तिलारी  येथे असलेल्या तेरवण मेढे धरणाच्या ठिकाणी असलेल्या गेट दूरूस्ती नावाखाली लाखो रुपये खर्च करून देखील या गेटच्या दोन्ही दरवाज्यातून पाण्याची गळती सूरू झाली आहे. निकृष्ठ कामामुळे  मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून तिलारी धरणाच्या जलाशयातील अतिरिक्त पाणी बाहेर पडण्यासाठी कोनाळकट्टा येथे असलेल्या खळग्यातील धरणाच्या  गेटचे काम सात महिन्यापूर्वी करण्यात आले आहे.   चारही  दरवाजे बंद असताना दोन दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे त्यामुळे तिलारी धरण सध्या गेट दूरूस्ती नावाखाली झालेल्या भ्रष्टाचारामुळे चर्चेत आले आहे.तरी या बेजबाबदार अधिकारी यांनी आणखी अडीच कोटीची कामे सुचवली आहेत. तिलारी धरणाच्या जलाशयातील पावसाळ्यात असलेले अतिरिक्त पाणी सांड कालव्यातून तिलारी नदीत सोडण्यासाठी कोनाळ येथे खळग्यातील धरण बांधण्यात आले येथे चार दरवाजे बसवले आहे.या धरणाच्या गेटची रंगरंगोटी नावाखाली लाखो रुपये उधळपट्टी केली जाते. निविदेत प्रस्तावित असलेल्या  डांबर व इतर रंग न देता  साधा रंग काढला जातो.या कामांची वरिष्ठानी दखल घेऊन चौकशी करण्याची गरज आहे.


No comments:
Post a Comment