तिलारी धरण जलाशयाच्या डाव्या कालव्याला मोठी गळती, गळतीमुळे धोका, लाखो रुपये पाण्यात - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2019

तिलारी धरण जलाशयाच्या डाव्या कालव्याला मोठी गळती, गळतीमुळे धोका, लाखो रुपये पाण्यात

तिलारी धरण जलाशयाच्या बोगद्याच्या तोंडावर गेट नंबर दोन लागलेली गळती.

दोडामार्ग / प्रतिनिधी
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी प्रकल्प निकृष्ठ कामामुळे  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निकृष्ट  कामामुळे जनतेच्या कोट्यावधी रुपये नुकसान होत आहे. तिलारी धरणाच्या अनेक कामात अधिकाऱ्यांच्या  दुर्लक्ष झाल्यामुळे कामे सूमार दर्जाची झाल्याची चर्चा आहे. कालव्यातील गाळ काढण्यासाठी पाणी सद्या बंद आहे. तरी सुध्दा  बोगद्यातून तोंडावर असलेल्या गेटला मोठी गळती लागली आहे. यातून पाणी बाहेर पडत आहे. बोगद्यातून  पाण्याचा विसर्ग सूरू झाल्यास  मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने या कामाची चौकशी करण्याबरोबरच येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचीही चौकशी करण्याची गरज आहे. आपल्या मर्जीतील  कोल्हापूर व पुणे येथील ठेकेदार लोकांना कामे देवून 'अर्थपूर्ण' घडामोडी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment