कोल्हापुर / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम
अध्यासनाने मारुती भाऊसाहेब जाधव यांनी निरुपण आणि वर्गीकरण केलेली
'तुकारामबावांची गाथा' शुक्रवार 29 नोव्हेंबर 2019 रोजी संत
साहित्याचे जेष्ठ अभ्यासक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते
प्रकाशित केली. सुमारे 1850 पृष्ठांची ही नवी गाथा क्राऊन साईजमध्ये दोन
भागात प्रकाशित करण्यात आली आहे. फॉन्ट साईज, भाषा, मांडणी, वर्गीकरण,
अभंगक्रमांक सर्व बाबतीत गाथेची रचना सर्वसामान्य वाचक समोर ठेऊन केलेली
आहे. वर्गीकरणात शासकीय प्रतीतील अभंग क्रमांक दिलेले असल्याने
अभ्यासकांनाही ही गाथा उपयुक्त ठरेल. त्यामुळे दोन्ही खंड एकत्रितपणे केवळ 850 रुपये निर्मिती मूल्य घेऊन विक्री करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला
आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या सर्वांना विद्यपीठाच्यावतीने संपर्क
करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment