कोल्हापुर / प्रतिनिधी
संपुर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, परतीचा पाऊसाने शेतीचे
मोठे नुकसान केले. ऑक्टोबर अखेर पाऊस लांबल्याने हातात आलेली पिके
अक्षरशः वाहून गेली. पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास
टाळाटाळ केल्याचे खासदार संभाजीराजे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी केंद्रीय
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची त्यानी भेट घेऊन यावर लवकरात लवकर
निर्णय घेण्याची विनंती केली होती. कंपन्यांच्या विरुध्द राज्यसभेत मी
प्रश्न उपस्थित करुन संबंधित कंपन्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या केंद्रीय राज्य कृषीमंत्री
पुरषोत्तम रुपाला यांनी लवकरच याविषयी लक्ष घालू व शेतकऱ्यांना
नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करु असे उत्तर दिले होते. काल सर्व शेतकऱ्यांना पीकविमा लागू करण्याचा अध्यादेश
सरकारच्या वतीने काढण्यात आला आहे. यामूळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांविषयी आपण काहीतरी करु शकलो अशी भावना खासदार संभाजीराजे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment