पाटणे वनविभागाकडून हत्ती व्यवस्थापन मोहिमेला प्रारंभ, नियंत्रणासाठी तंबूची उभारणी - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2019

पाटणे वनविभागाकडून हत्ती व्यवस्थापन मोहिमेला प्रारंभ, नियंत्रणासाठी तंबूची उभारणी


पाटणे (ता. चंदगड) येथील वनविभागाच्या वतीने ``हत्ती व्यवस्थापन`` मोहिम हाती घेण्यात आली असून यासाठी हत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी तंबुची उभारणी केली आहे.

संपत पाटील/ चंदगड
चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्यांना हत्तीचे संकट कधीही संपणारे आहे. हत्ती व माणूस हा संघर्ष गेले अनेक वर्षे सुरु आहे. त्यामुळे या संघर्षाला माणूस वैतागला असून आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हत्तीच्या त्रासला कंटाळलेल्या शेतकरी वर्गाला वनविभागाच्या हत्ती हटाव मोहीमेमूळे थोडासा दिलासा मिळाला आहे. "हत्ती व्यवस्थापन "मोहोमेअंतर्गत आता वनविभाग हत्तीचा वावर असलेल्या ठिकाणी हत्तीच्या हलचालीवर लक्ष ठेऊन त्याला जंगलातच पिटाळून लावण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
तालुक्यामध्ये चंदगड व पाटणे असे दोन विभाग आहेत. त्यांच्यामार्फत रोज हत्ती बाधीत क्षेत्रात गस्त घालून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी उपयोजना केल्या जातात. मात्र कर्मचाऱ्यांनाही मर्यादा असल्याने हि उपाययोजना तोकडी पडते. कर्मचाऱ्यांच्या या प्रकाराला हत्ती सरावले असल्याने त्याच्यांकडून उपद्रव सुरुच आहे. पाटणे वनपरिक्षेत्रामार्फत पार्ले धनगरवाडा येथे दोन तंबूंची उभारणी करणेत आली आहे. त्यामध्ये ५ लोकांचा गट कार्यरत आहे. पाटणे वनपरिक्षेत्रात हत्तीचे आगमन हे पार्ले धणगरवाडाच्या आसपास मालकीच्या क्षेत्रात होत असते. त्यामुळे धनगरवाडा येथून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोईचे होईल असे वनविभागाचे म्हणन आहे. तंबूत फटाके, सुरबाण, ढोल-ताशे, दोरखंड, अॅम्पलीपायर आदीची व्यवस्था  केली  आहे. या उपक्रमास हत्ती व्यवस्थापन केंद्र असे नामकरण केले आहे. हत्तीचा वावर असलेल्या क्षेत्रात माहिती व  सुचना फलक लावणेत आले आहेत. भात, नाचना पिकांच्या सुगीचा, हंगाम संपत आला असुन ऊस तोड सुरु आहे. नजीकच्या सर्व साखर कारखान्यांना पत्रव्यवहार करुन हत्ती बाधीत शेतातील ऊस प्रधान्याने उचलण्याची विनंती करणेत आली आहे. वनविभागाचे गस्तीपथक हत्तींच्या वावरावर लक्ष ठेवून आहे. मानव वनहत्ती संघर्ष टाळणे किंवा तीव्रता कमी करणेसाठी या सर्व उपाययोजना करणेत येत  असलेचे मत पाटणेचे वनक्षेत्रपाल पाटणे  दत्ता पाटील यांनी सांगितले. या मोहिमेत वनपाल बी. आर. भांडकोळी, ए. डी. शिदे, एन. एम. धामणकर, वनरक्षक एस. एस. पाटील, एस. एस. जितकर, डी. एम. बडे, डी. एस. रावळेवाड, ओ. जी. जंगम, एम. आई. सनदी, जी. पी. वळवी, बी. बी. न्हावी, वनसेवक चंद्रकांत बांदेकर, अर्जुन पाटील, तुकाराम गुरव, मोहन तुपारे यांच्यासह वाहनचालक विश्वनाथ नार्वेकर  असे पथक कार्यरत आहे.

No comments:

Post a Comment