![]() |
कै. र. भा. माडखोलकर यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. अजित अभ्यंकर, व्यासपीठावर प्राचार्य श्री. पाटील, प्रा. श्री. पाटील व इतर. |
चंदगड / प्रतिनिधी
भारतात आज
श्रमसंस्कृतीचा लोप होत आहे. भारतातील आर्थिक विषमतेची दरी रुंदावत आहे. सुशिक्षित
बेरोजगारी, यशक्तीचा ऱ्हास, चुकीची
सरकारी धोरणे, स्त्रियांची असुरक्षितता व परावलंबित्व या भयंकर
समस्या आहेत. शेतमालाला हमी भाव मिळणे, शेतकऱ्यांची आर्थिक
अनिश्चितता संपणे, यासाठी आजच्या युवकानी कालोचित
शिक्षण घेवून नियोजनबध्द प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. अजित
अभ्यंकर यांनी केले. चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात कै. र. भा. माडखोलकर यांच्या
९४ व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे होते.
प्रा. अभ्यंकर पुढे
म्हणाले, ``बेरोजगारी ही सामाजिक व आर्थिक समस्या आहे.
शिक्षण व रोजगार आणि विकास यांचा तुटलेला सांधा
जोडण्यासाठी व्यावहारिक शिक्षणाची गरज आहे. अध्यक्षस्थानावरून
बोलताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी ' विद्यार्थ्यांनी
वैचारिक प्रगल्भता जपली पाहिजे. विचारांचा जागर व प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे
आवाहन केले. प्रा.
ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कु. वैष्णवी सुतार हिने मनोगत व्यक्त केले. यावेळी पारितोषिक वितरणाचा
कार्यक्रम संपन्न झाला. प्रा. डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना
प्रमुख प्रा. एस. एम. पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला सी. व्ही. आर. बांदिवडेकर, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, अॅड. श्रीपतराव शिंदे, प्रा. आर. पी. पाटील, एस. आर.
पाटील, ज. गा. पाटील, अशोक
पाटील, डी. जी.
तुपारे, एल. डी.
कांबळे, प्रा. सुभाष जाधव, प्रा.
एम. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व
विद्यार्थ्यी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment