चंदगड : सी एल वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती 'सार्वत्रिक निवडणूक २०२५' डिसेंबर २०२५ अखेर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आरक्षण सोडत प्रशासकीय इमारत, ऑडिटोरियम हॉल, तहसील कार्यालय चंदगड घेण्यात येणार आहे. सोमवार दि. १३/१०/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता होणाऱ्या या सोडत प्रसंगी मतदार व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती समितीची मुदत संपून तीन वर्षे झाली तरी विविध कारणास्तव या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. तब्बल आठ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीबद्दल मतदार व नागरिकांसह राजकीय पक्षांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे चंदगड येथे होणाऱ्या या आरक्षण सोडत प्रसंगी मतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment