झेडपीत 'चंदगड' मधून सर्व महिलाच, पंचायत समिती कुदनूर, अडकूर व तुर्केवाडी सर्वसाधारण, सभापतीपदी पुरुष - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2025

झेडपीत 'चंदगड' मधून सर्व महिलाच, पंचायत समिती कुदनूर, अडकूर व तुर्केवाडी सर्वसाधारण, सभापतीपदी पुरुष


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

     आगामी जिल्हा व परिषद पंचायत समिती सदस्य व सभापती आरक्षण प्रक्रिया आज प्रशासकीय, इमारत ऑडिटोरियम हॉल, तहसील कार्यालय चंदगड येथे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे व तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शांततामय वातावरणात पार पडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

  आरक्षणा नुसार चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदेवर जाणाऱ्या चारही जागा महिलांसाठी राखीव झाल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेकांच्या पदरी निराशा आली आहे. मात्र चंदगडचे सभापती पद पुरुषांसाठी खुले झाल्याने पुरुष मंडळी खुशीत आहेत.  

आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोन नंतर पार पडलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुढील प्रवर्गांना लॉटरी लागली आहे. 


 पंचायत समिती चंदगड तालुका 


गवसे- अनुसूचित जाती (महिला), 

कोवाड- नागरिकांचा मागास प्रवर्ग/ओबीसी (महिला),  

तुर्केवाडी- सर्वसाधारण, 

हेरे- सर्वसाधारण (महिला), 

कुदनूर - सर्वसाधारण, 

तुडये - सर्वसाधारण (महिला),  

अडकुर- सर्वसाधारण, 

माणगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग/ओबीसी.


 *जिल्हा परिषद (चंदगड तालुका)*

६५. अडकूर : खुला (महिला)

६६. माणगांव : ओबीसी (महिला) 

६७. कुदनूर खुला : महिला

६८. तुडये : ओबीसी (महिला)


*आजरा तालुका* 

५८. उत्तूर : खुला

५९. पेरणोली : खुला


*गडहिंग्लज तालुका*

६०. कसबा नूल :ओबीसी 

६१. हलकर्णी : खुला

६२. भडगांव : खुला

६३. गिजवणे : खुला (महिला)

६४. नेसरी: खुला


*पंचायत समिती सभापती*

सांगरूळ - पुरूष (अनूसुचीत जाती)

हातकंणगले - महिला (अनुसुचीत जाती)

कागल- महिला

चंदगड- पुरूष

आजरा- सर्वसाधारण महिला

गगनबावडा- महिला

शाहूवाडी- महिला

शिरोळ- पुरूष

पन्हाळा- पुरूष

भुदरगड- महिला

राधानगरी- पुरूष

गडहिंग्लज- पुरूष

No comments:

Post a Comment