भरमूआण्णा पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड
तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करून कर्नाटकात जाणारे पाणी
आडवावे अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी केली आहे. याबात त्यांनी
पाटबंधारे अधिकाना भेटून सूचनाही केल्या आहेत.
चंदगड
तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. तालुक्यात झालेल्या मध्यम
व लघु पाटबंधारे प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठवले
जाते. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत तालुका समृद्ध आहे. परंतु गेल्या
अनेक वर्षात ताम्रपर्णी व घटप्रभा नदीवरी कोल्हापूर पद्धतीच्या
बंधाऱ्यांची योग्य प्रकारे
दुरुस्ती केली गेली नसल्याने बंधाऱ्यातून गती होत आहे. परिणामी बंधाऱ्यातील पाणी
कर्नाटकात वाहून जात आहे. धरणात कर्नाटकात सोडण्यासाठी पाणी साठवले
जाते का? असा संतप्त प्रश्न त्यांनी यावेळी
उपस्थित केला. एप्रिलनंतर तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी, जीर्ण बरगे बदलून नवीन घालावेत. बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकात वाहून
जाणार नाही याची पाटबंधारे विभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी अशी
सुचना श्री. पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment