शिवाजी विद्यापीठ मैदानी स्पर्धेत कोवाडचा वल्लभ पाटील सर्वात वेगवान धावपटू - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2019

शिवाजी विद्यापीठ मैदानी स्पर्धेत कोवाडचा वल्लभ पाटील सर्वात वेगवान धावपटू


कोल्हापूर येथील विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक स्वीकारताना मध्यभागी वल्लभ पाटील सोबत प्रशिक्षक प्रा. आर. टी. पाटील व अन्य.

कालकुंद्री / प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरु असलेल्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा वल्लभ रामचंद्र पाटील शंभर मीटर धावणे प्रकारातील सर्वात वेगवान धावपट्टू ठरला. त्याची राज्यस्तरीय क्रीडामहोत्सव  स्पर्धा आणि आखिल भारतीय मैदानी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. यापूर्वी शंभर मीटर धावणे प्रकारात १७ वर्षाखालील गटातही त्याने राष्ट्रीय स्तरापर्यंत  यश मिळवले होते. त्याला सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम. व्ही. पाटिल, जोतिबा  वांद्रे यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य व  प्रा आर टी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment