कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी इजाजखान पठाण - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2019

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुकाध्यक्षपदी इजाजखान पठाण

संपर्क प्रमुखपदी युवराज पाटील, जिल्हा कोअर कमिटीच्या सदस्यपदी बामणे, तारळे यांची निवड
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ येथील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देताना असोसिएशनचे संस्थापक जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळे व अन्य सदस्य.
जयसिंगपूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी इजाजखान पठाण (दै.महानकार्य) तर कार्याध्यक्षपदी अभय वाळकुंजे (दै.महानकार्य) संपर्कप्रमुखपदी युवराज पाटील (दै.सकाळ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटीच्या सदस्यपदी संतोष बामणे, संतोष तारळे (दै.पुण्यनगरी) यांची व जमीर मुजावर (द् कोथळी टाईम्स) यांना आदर्श पत्रकार पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आला.
जयसिंगपूर येथे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. ही बैठक असोसिएशनचे संस्थापक जिल्हाध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा कौंन्सील सदस्य दगडू माने, सलीम खतीब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी- सचिव विशाल बरमे (दै.लोकमत), उपाध्यक्ष जमीर पठाण (दै.पुढारी), निनाद मिरजे (दै.पुण्यनगरी), शहानवाज अपराज (दै.पुढारी), सुभाष इंगळे (दै.महानकार्य) तर सदस्यपदी निखिल विभुते (दै.लोकनेता), मनोजकुमार शिंदे (दै.पुढारी), संदिप बावचे (दै. लोकमत) विजय सुर्यवंशी (दै.पुण्यनगरी), विनोद पाटील (दै.पुण्यनगरी), अभय वाळकुंजे (दै.महानकार्य), रोहित तवंदकर (दै.पुण्यनगरी), विजयराव जगदाळे, सुरेश आसगेकर (दै.नवा महाराष्ट्र), मुन्नाभाई नदाफ (दै.पुण्यनगरी), अमर नलवडे (दै.महानकार्य), राजेंद्र प्रधान (दै.जनउर्जा), अरुणकुमार चौगुले (दै.तरुण भारत) यांची निवड करण्यात आली. 
दरम्यान, जिल्हाध्यक्ष निर्मळे व जिल्हा कॉन्सील सदस्य दगडू माने यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी निखिल विभुते यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष निर्मळे यांनी  पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना कटीबध्द असून येत्या १२ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त होणाऱ्या अधिवेशनात पुरस्कार वितरण, पत्रकारांना मार्गदर्शन व विशेषांकाचे प्रकाशन अशा संयुक्त समारंभास आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन त्यांनी केले. कोअर कमिटीचे नुतन सदस्य संतोष बामणे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment