![]() |
रमेश शिंगटे |
गडहिंग्लज / प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे मांगनुर तर्फ सावतवाडी (ता. गडहिंग्लज) येथील रमेश पांडूरंग शिंगटे यांना पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देण्यात आले. रमेश शिंगटे यांनी आपले शिक्षण गावातच घेऊन १९८६ साली मुंबई पोलीस दलात दाखल झाले. पोलीस दलात काम करताना आपल्या ३४ वर्षाच्या सेवेत उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल आतापर्यंत ३९७ बक्षिसे तर रोख २३ हजार रूपये मिळाले आहेत . मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या ते पोलीस हवालदार लेखनिक म्हणून आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील सावतवाडीसारख्या दुर्गम भागातील एका पोलीसाला राष्ट्रपती पदक मिळाल्याने सर्वत्र कौतूक केले जात आहे.
No comments:
Post a Comment