चंदगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2020

चंदगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उत्साळी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करताना नयन देसाई, बाजूला सरपंच माधुरी सावंत-भोसले
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. चंदगड येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार विनोद रणवरे यांच्या हस्ते, पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी आर. बी  जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, नायब तहसीलदार डि. एम. नांगरे, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, सभापती अॅड अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवनगेकर, माजी सभापती शांताराम पाटील, पं.स.सदस्य दयानंद काणेकर यावेळी उपस्थित होते.

पोलिस ठाण्यात पो. नि. अशोक सातपूते, चंदगड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, माडखोलकर महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. पी. आर. पाटील, न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य व्ही. बी. तुपारे, हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राचार्य डाॅ. पी. वाय. निंबाळकर, छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय ढेकोळी येथे रघुनाथ नाकाडी, कोदाळी ग्रामपंचायतीमध्ये  कु. तनया निळु गवस, उत्साळी ग्रामपंचायतीमध्ये नयन देसाई, ढेकोळी ग्रामपंचायतीचा सरपंच कु नरसिंगराव गंगाराम पाटील, डुक्करवाडी (रामपूर) प्राथमिक शाळेमध्ये अध्यक्ष नंदकुमार ढेरे, डुक्करवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राजू शिवनगेकर, हनुमान दुध संस्था विठ्ठल पाटील, जयशिवराय दूध संस्था आप्पाजी वरपे, बसर्गे येथील भावेश्वरी विद्यालयात जि. प. सदस्य विद्या पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment