कोवाड येथे खेळ मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2020

कोवाड येथे खेळ मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्पर्धा संपन्न

कोवाड येथे खेळ मंत्रालय आणि नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित स्पर्धेतील विजेते.
कोवाड / प्रतिनिधी   
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर 27 जानेवारी रोजी देशातील युवक वर्गामधील खिलाडी वृत्तीला प्रोत्साहन मिळावे. या भावनेतून नेहरू युवा केंद्र, कोल्हापुर यांच्या वतीने चंदगड तालुका वैयक्तिक क्रीडा स्पर्ध्या संपन्न झाल्या. यामध्ये गोळाफेक, लांब उडी व 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त मदतीने या स्पर्धा झाल्या. 
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील, जिल्हा युवा समन्वयक पूजा सैनी  यांनी खेळांडुना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील खेळाडुना चालना देण्यासाठी नेहरू युवा केंद्र काम करत असल्याची माहिती केंद्राचे चंदगड तालुका प्रतिनिधि रेहान जमादार यांनी दिली.  संपूर्ण चंदगड तालुक्यातील खेळाडूनी या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे स्पर्धेमध्ये रंगत वाढली. सर्व विजेत्या खेळाडुना युवा केंद्रामार्फत चषक व प्रमाणपत्र देण्यात आली. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. आर. टी. पाटील यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. ए. एस. आरबोले, डॉ. एस. एन. कांबळे उपस्थित होते. प्रा. एम. एस. घोळसे यांनी आभार केले. यावेळी महाविद्यालयाचे खेळाडू, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थीत होते.
सदर स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे -  गोळाफेक : मारुती तातोबा तेऊवाडकर (कालकुंद्री, प्रथम),  वल्लभ रामचंद्र पाटील (मलतवाडी, द्वितीय), राहुल विलास भिंगुड़े (तेऊरवाड़ी,  तृतीय). लांबउडी : वल्लभ रामचंद्र पाटील (मलतवाडी, प्रथम क्रमांक),   प्रथमेश विनायक पोटेकर (कोवाड,  द्वितीय), योगेश संजय पाटील (मलतवाडी, तृतीय). 1500 मीटर धावणे संदीप बाबजी यळवटकर (चंदगड, प्रथम), वैजनाथ गोपाळ बोकडे (कार्वे, द्वितीय), अजय परसु लाड (किटवाड, तृतीय. 

No comments:

Post a Comment