तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तरुणांचे पोलिसांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2020

तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तरुणांचे पोलिसांना निवेदन

चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत या मागणीचे निवेदन पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांना देताना तालुक्यातील तरुण. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून बंद असणारे मटक, जुगार, गोवा बनावटीची दारु यासारखे अवैध धंदे सहा महिन्यापासून राजरोसपणे चालू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्थ होत आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करावे अशा मागणीचे निवेदन तालुक्यातील तरुणांनी चंदगड ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांना दिले आहे. 

  • निवेदनात म्हटले आहे की, ``अवैध धंदे या गंभीर विषयाबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केली आहे. आपल्या आशीर्वादामुळेच अवैध धंदे सुरू असल्याचे लोकांतून बोलले जात आहे. अवैध धंद्यामुळे तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. गोवा बनावटीची दारूची घराघरात बेकायदेशीर विक्री होत असल्याने तरुण व्यसनाधीन बनत आहेत. चंदगड तालुक्यातील अवैध धंदे येत्या पंधरा दिवसात बंद नाही झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा तरुणांनी दिला आहे. निवेदनावर अड. संतोष मळविकर, नितीन फाटक, संदिप नांदवडेकर, पुंडलिक कांबळे, महेश वारंग, आनंद नाईक, संदिप पाटील, अमर कांबळे यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment