![]() |
क्षमा कुंदन चौगुले |
बेळगाव येथील जीएसएस महाविद्यालयाची बी. एस्सी. भाग एकची विद्यार्थिनी व आठ कर्नाटक एअर स्कॉड्रनची छात्रा क्षमा कुंदन चौगुले हिची रविवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी (आरडी परेड) निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिला प्राचार्य व एसीसी आठ कर्नाटक एअर स्कॉड्रन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिक्षक कुंदन चौगुले यांची क्षमा ही कन्या आहे. तिच्या निवडी बद्द्ल सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment