हरळी येथील ऊसतोडणी कामगारांना मंत्री सतेज पाटील यांच्याकडून मदतीचा हात - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2020

हरळी येथील ऊसतोडणी कामगारांना मंत्री सतेज पाटील यांच्याकडून मदतीचा हात

हरळी (गडहिंग्लज) येथे झोपड्या जळालेल्या कुुटुंबियांना मंत्री सतेज पाटील यांच्या वतीने मदत देताना कार्यकर्ते. 
हरळी / प्रतिनिधी
हरळी (गडहिंग्लज) येथे दरवर्षी येणाऱ्या ऊसतोड़ कामगारांच्या राहत्या झोपडयांना अचानक आग लागली. यामध्ये तब्बल सात झोपड्यांची राखरांगोळी झाली.त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला. सर्व जीवनावश्यक वस्तुंचा चुराडा झाला. दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या वस्तु नष्ट झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. याची माहीती समजताच सामाजिक बांधिलकीतून  मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी माणुसकीच्या नात्याने या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. या पिडीत कुटुंबाना सर्व जिवनावश्यक वस्तु दिल्या. त्याचबरोबर आपल्या सोबत कार्यकर्त्यांना घेवून आपतीग्रस्त  ठिकाणी भेट दिली. झालेल्या हानी बद्दल कळकळीची भावना व्यक्त करुन मदत केली. 

No comments:

Post a Comment