तडशिनहाळ येथील दिपक कदमची उत्तर प्रदेश कबड्डी संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2020

तडशिनहाळ येथील दिपक कदमची उत्तर प्रदेश कबड्डी संघात निवड

दिपक अर्जुन कदम
चंदगड / प्रतिनिधी
तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील दिपक अर्जुन कदम याची उत्तर प्रदेश कब्बडी संघात निवड झाली आहे. नुकताच  हरियाणा येथे झालेल्या कबड्डी निवड चाचणी मध्ये  हजारो मुलांनी सहभाग घेतला होता. दीपकचा ऑल राऊंडर खेळ बघून ज्येष्ठ कबड्डी संघाचे मालक  सोईल तुषार यांनी तीन वर्षासाठी उत्तर प्रदेश संघात निवड केली.  दिपकचा कबड्डीचा प्रवास शालेय स्तरापासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेत सुरु झाला. दिपकला कबड्डीची खूप आवड गावातील संघर्ष ग्रुप मधून कबड्डी खेळायचा सुरुवात केली. अल्पावधीत तो टीमचा अष्टपैलू खेळाडू बनला. चंदगड, गडहिंग्लज व आजरासह कर्नाटकतील बेळगाव व खानापूर सीमाभागामध्ये खेळायला सुरुवात केली. या स्पर्धांमध्ये चांगले यश प्राप्त केले. एप्रिल महिन्यात होणाऱ्या ज्येष्ठ कबड्डी लीगमध्ये तडशिनहाळ सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू उत्तर प्रदेश संघातून खेळणार असल्याने तालुक्यात व गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याने चांगली कामगिरी करून गावचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. 



No comments:

Post a Comment