कालकुंद्री / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मूलद्रव्य वर्ष दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस एस एस जांभळे होते. प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ ए.सी. आगरकर उपस्थित होते.
शास्त्रज्ञ डॉ. आगरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात आवर्तसारणी विकास आणि महत्त्व मूलद्रव्यांचा शोध कसा लागला, माणसाला प्रश्न पडल्याशिवाय त्याचे उत्तर शोधण्याची सुरुवात होत नाही, एखाद्या गोष्टीची उकल करण्यासाठी तो धडपडत नाही. असे सांगतानाच मूलद्रव्यांचा शोध व संकल्पना समजून घेणे एक रोमांचक अनुभव असल्याचे स्पष्ट केले. मूलद्रव्यांचे बाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम पाटील यांनी केले. प्रास्ताविक तुकाराम वांद्रे यांनी केले. यावेळी संस्था सचिव एम व्ही पाटील, प्रा एन एस पाटील. प्राचार्य कल्याणराव पुजारी,श्री ए एस पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा विकास ओऊळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. निशिगंधा कांबळे. किरण चलवेटकर. प्रा. सुरभी शिरोळकर, प्रियंका सुतार, राजश्री पाटील आदींनी परिश्रम घेतले. आभार प्रा. प्रियांका माने यांनी मानले.
No comments:
Post a Comment