![]() |
प्रज्वल संजय पाटील |
मजरे जट्टेवाडी (ता. चंदगड) येथील प्रज्वल संजय पाटील याला कुडो मार्शल आर्टच्या ६५ व्या विद्यालयीन राष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. मध्य प्रदेश मधील सागर येथे या स्पर्धा पार पडल्या. 17 वर्षा खालील गटामध्ये प्रज्वल ने आपली उत्कृष्ठ कामगिरी बजावली. या खेळामध्ये बॉक्सिंग, जुडो, कराटे बॉक्सिंग यांचे मिश्रण असते, असे प्रशिक्षक सेंन्सी नित्यानंद जुवेकर यांनी सांगितले. प्रज्वल पर्वरी गोवा येथील एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूल नववीच्या वर्गात शिकत आहे. सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्याने कांस्यपदक मिळवलं आहे. राज्यस्तरीय अनेक स्पर्धा मधून त्यांना उत्तम यश मिळवले आहे. त्याला मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, वडील संजय पाटील, आई स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment