![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप वाचनालयाला पुस्तके प्रदान करताना विजय पाटील, मान्यवर व वाचनालयाचे सदस्य. |
अमेरिकेसारखी राष्ट्रे जगात महासत्ता बनतात याचे मुख्य कारण तिथे छोट्या गावातही असलेली तीन तीन मजली वाचनालये, एका व्यक्तीला एका वेळी पंचवीस पंचवीस पुस्तके मिळण्याची सुविधा, वाचनाची आवड व त्यांचे अगाध वाचन हेच आहे. असे प्रतिपादन अमेरिकेत इंजिनिअर असलेले कालकुंद्री ता चंदगड गावचे सुपुत्र विजय पाटील यांनी गावातील सार्वजनिक वाचनालयाला दिलेल्या पुस्तके प्रदान प्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी सरपंच विनायक कांबळे होते.
स्वागत वाचनालय अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. प्रस्ताविक प्रा. व्ही. आर. पाटील यांनी केले. पाटील पुढे म्हणाले ``अमेरिकेतील शाळांत विद्यार्थ्यांना रोज ठराविक पानांचे वाचन व त्यावरील नोंदींची सक्ती असते. यातून त्यांना वाचनाची आवड निर्माण होते. आपल्याकडील तरुणांनी मोबाईलचा वापर कसा करावा हे प्रथम शिकले पाहिजे. वाचनामुळे व्यक्ती मोठा होतो हे त्यांनी आवर्जून सांगितले.`` यावेळी विजय पाटील यांची अमेरिकेतच शिकणारी कन्या वेदांती हिने अस्खलित अमेरिकन इंग्लिश मध्ये भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झेवियर क्रूज, सचिन कोकितकर आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विजय पाटील यांचे कुटुंबीय, उपसरपंच सुरेश नाईक, सदस्य ईश्वर वरपे, वाचनालय चे सर्व सदस्य व पुस्तक प्रेमी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. आभार शिवाजी खवणेवाडकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment