![]() |
केंद्र शाळा कोवाड येथे जिजाऊ विवेकानंद जयंती निमित्त फोटो पूजन करताना मुख्याध्यापक श्रीकांत पाटील शिक्षक व विद्यार्थी. |
कोवाड ता. चंदगड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिमापूजन मुख्याध्यापक श्रीकांत वै. पाटील यांनी केले.
प्रमुख वक्ते गणपती लोहार यांनी स्वामी विवेकानंद व जिजाऊ यांच्याबद्दल माहिती दिली. यावेळी झालेल्या बाल सभेत रचना खोराटे, सोनम कारेकर. अफिफा बाडकर, आदित्य पाटील, आरत्या हंचनमनी, लावण्या जोशी, नंदिनी कुंभार, विहान पाटील, आरोही वांद्रे,याज्ञी आढाव, क्रांती खोराटे, समीक्षा पाटील , साहिल पाटील, सिद्धार्थ वांद्रे, सिद्धार्थ मनवाडकर, श्र्लोक कुट्रे, फरहान मुलाला, मल्हार बुरुड सुफियान मुल्ला, तहजीब मुल्ला आदी पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून रचना खोराटे हिने जिजाऊ च्या तर सोनम कारेकर ने सईबाई व आदित्य पाटील याने बालशिवाजी तसेच अफीफा बाडकर या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा केली करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वागत एस. ए. पाटील यांनी केले. आभार उज्वला नेसरकर यांनी मानले. यावेळी भावना आतवाडकर, मधुमती गावस, कविता पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment