स्पर्धा परीक्षेसाठी मातृभाषेतून अभ्यास अनिवार्य - प्रा. संतोष पाथरवट - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2020

स्पर्धा परीक्षेसाठी मातृभाषेतून अभ्यास अनिवार्य - प्रा. संतोष पाथरवट

कोवाड (ता. चंदगड) येथे मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ मान्यवरांना मराठी पुस्तके भेट देऊन करण्यात आला.
कालकुंद्री / प्रतिनिधी
मराठी मातृभाषा ही मातीचा हुंकार आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक संधी प्राप्त करू शकतो; याची जाणीव नसल्यामुळेच आपण आपल्या भाषेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहोत. असे प्रतिपादन आर.पी.डी कॉलेज सावंतवाडीचे मराठी विषयाचे प्राध्यापक संतोष पाथरवट यांनी केले. ते कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील होते.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख प्रा. आर. डी. कांबळे यांनी पंधरवडा कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले पाथरवट यांनी विविध क्षेत्रात करियर व संधी प्राप्त करण्यासाठी मराठीचा जागर करणे अनिवार्य असल्याचे शेवटी सांगितले. यावेळी प्रा. बी. एस. पाटील आदींसह मराठी विभागाचे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment