मुंबईस्थित ग्रामस्थाकडून उमगांव शाळेला पुस्तके व कपाट भेट - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2020

मुंबईस्थित ग्रामस्थाकडून उमगांव शाळेला पुस्तके व कपाट भेट

उमगांव येथील प्राथमिक शाळेला मूंबईकर ग्रामस्थाकडून कपाट, पुस्तके व चषक स्विकारताना मुख्याध्यापक शंकर शिंदे व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
उमगाव (ता. चंदगड) शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व नोकरी,व्यवसाया निमित्त मुंबई येथे स्थायिक झालेल्या मूूूंईब ग्राामस्थांकडून उमगाव प्राथमिक शाळेला तिजोरी कपाट व वाचनालयासाठी पुस्तके सभापती अॅड अनंत कांबळे, नगराध्यक्षा सौ.प्राची काणेकर,जि.प.सदस्या विद्या पाटील,प्रविण वाटंंगी यांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली.
प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक शंकर शिंदे यानी केले.सभापती अॅड अनंत कांबळे यांनी शाळेचा विकास करण्यासाठी सर्वांचेच सहकार्य मोलाचे आहे. परिपूर्ण विद्यार्थ्यां घडण्यासाठी मूंबई ग्रामस्थांनी केलेली मदत या विद्यार्थ्यांना जीवनात मोलाची ठरणार आहे. यावेळी रेल्वे खात्यात पोलिस  उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला शाळेचा माजी विद्यार्थी लक्ष्मण गावडे यानी वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही मुंबईकर ग्रामस्थ शाळेला सर्वतोपरी मदत करत आहोत.धावत्या यूगात व दळणवळणाची सोय नसलेल्या पश्चिम भागातील विद्यार्थ्यां शिक्षणात मागे राहू नये या साठी आम्ही नेहमीच मदतीचा हात देऊ असे अश्वासन दिले.यावेळी प्रविण वाटंगी,केंद्रप्रमुख जी.बी.जगताप,सूनिल देसाई,मनोहर कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली.यावेळी सरपंच गणपती सूतार,उपरपंच रूक्माना गावडे,पोलिस पाटील रवींद्र  गावडे,मंडळाचे अध्यक्ष गंगाराम गावडे,बिपीन सांवत,भारत गावडे,चंद्रकांत गावडे, राजू सांवत,मोहन गावडे,काशिनाथ गावडे,पांडूरंग धूरी,तानाजी गावडे,राजाराम गावडे,रामा गावडे,अमृत तळकटकर,रामचंद्र गावडे, लहू सांवत,सूर्यकांत गावडे,अनंत सावंत,सिध्देश गावडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते आभार विनोद कोरवी यानी मानले.

No comments:

Post a Comment