पाटणे फाटा ते पारगड रस्ताच्या निकृष्ठ कामाचे गुरूवारी होणार थर्ड पार्टी इन्सपेक्शन - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2020

पाटणे फाटा ते पारगड रस्ताच्या निकृष्ठ कामाचे गुरूवारी होणार थर्ड पार्टी इन्सपेक्शन

पाटणे फाटा ते पारगड रस्त्यावर असे खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
चंदगड / प्रतिनिधी
पाटणे फाटा (ता.चंदगड) ते पारगड रस्त्यावर झालेल्या  निकृष्ट दर्जाच्या कामाचे थर्ड पार्टी इन्सपेक्शन गुरूवार दि १६जानेवारी रोजी होणार आहे. कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर चंदगड तालुक्यातील युवकांनी १०जानेवारी रोजी याबाबत  जोरदार आंदोलन केले होते.त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता संभाजी माने याबाबचे आदेश दिले आहेत.गूरूवारी या रस्ताच्या कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन सांगली च्या बांधकाम अभियंता प्रतिमा घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
 पाटणेफाटा ते पारगड या रस्त्याचे पॅचवर्क चे काम ठेकेदाराने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले होते. पंधरा दिवसातच या रस्त्यावर पून्हा खड्ड्याचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे तालुक्यातील  अनिल तळगुळकर , विश्वनाथ ओऊळकर , गारत गावडे , मोहन पाटील , प्रशांत आपटेकर,सागर पाटील आदी युवकांनी महिनाभरापूर्वी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच रस्ता उकरुन पोलखोल करण्यात आली होती . त्यानंतर या रस्त्याचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले . मात्र , अद्याप ही पाहणी झाली नसल्याने अखेर पुन्हा शुक्रवारी १०जानेवारी रोजी बांधकाम विभागासमोर ' भीक मागो ' आंदोलन करण्यात आले . यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना धारेवर धरले तसेच गव्हर्नमेंन्ट पॉलिटेक्निक किंवा शिवाजी विद्यापीठाच्या डिओटी विभागाकडून रस्त्याची त्रयस्तामार्फत  त्वरीत पहाणी करावी अशी मागणी केली.त्यामुळे या निकृष्ठ कामाचे डब्बल सँपलीन करण्यात येणार असून एक सँपल बांधकाम खात्याकडे तर दूसरे सँपल विद्यापिठाच्या डिओटी विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.  

या रस्त्याचे निकृष्ठ काम करण्या-या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी कारवाई मध्ये  दिरंगाई केली जात असल्याचा आरोप अंदोलनकर्त्या युवकांनी केला आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या संस्थांकडून पाहणी होऊन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा,तसेच या कारवाईत काही हयगय झाली तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे अंदोलनकर्ते अनिल तळगूळकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment