कालकुद्री येथील सुजाता पाटील यांना महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2020

कालकुद्री येथील सुजाता पाटील यांना महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर

सौ. सुजाता मारुती पाटील
कोवाड / प्रतिनिधी 
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सौ. सुजाता मारुती पाटील याना राजश्री छत्रपती शाहू राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन कडून दिला जाणारा मानाचा असा महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीमंत नारायण घोरपड़े नाट्यगृह, इचलकरंजी येथे 5 जानेवारी 2020 रोजी समाजसेवीका सिंधुताई संकपाळ यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानी परिसरात केलेल्या सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रातील कार्यांसाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सध्या त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या असून या भागातून त्यांनी जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी केलेल्या समाज कार्याची पोच पावती स्वरुपात त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment