पोलिस वर्धापन दिनानिमत्त रवळनाथ हायस्कुलच्या विद्यार्थांनी घेतली ठाण्याची माहीती - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2020

पोलिस वर्धापन दिनानिमत्त रवळनाथ हायस्कुलच्या विद्यार्थांनी घेतली ठाण्याची माहीती

पोलिस वर्धापनदिन कार्यक्रमावेळी रवळनाथ हायस्कुलचे विद्यार्थी व पोलिस.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड पोलीस ठाणे येथे आज रोजी दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी पोलीस वर्धापन दिनाचे अनुषंगाने कन्या विद्यामंदिर व रवळनाथ हायस्कूलचे विद्यार्थ्यांना चंदगड पोलिस ठाणेस भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्रागार, लॉकअप गार्ड क्राईम, गोपनीय, पोलीस ठाणे अंमलदार कक्षा बाबत सर्व माहिती पोलिस कर्मचारी वर्गाने दिली. चंदगड पोलिस ठाणे शस्त्रागार मध्ये असलेल्या शास्त्रांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवुन शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी पोलिस निरीक्षक अशोक सातपुते, सर्व पोलिस कर्मचारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment