ओलम शुगर्सकडून डिसेंबर अखेरची एफ. आर. पी. प्रमाणे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - भरत कुंडल - चंदगड लाईव्ह न्युज

03 January 2020

ओलम शुगर्सकडून डिसेंबर अखेरची एफ. आर. पी. प्रमाणे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा - भरत कुंडल

भरत कुंडल
कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडून एफ. आर. पी. प्रमाणे ३१ डिसेंबर २०१९पर्यंत ची बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याचे कारखाना प्रशासनचे प्रमुख भरत कुंडल यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
हेमरस तथा ओलम अँग्रो प्रा. लि. कडून ३१ डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत गाळप केलेल्या ऊसाचे एफ आर पी नुसार होणारे बील संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. असे म्हटले आहे. आतापर्यंत चालू गळीत हंगामात आजअखेर एकुन 51 दिवसात कारखान्याकडून २६६८६०मे.टन उस गाळप करण्यात आला आहे.११:५४ रिकव्हरी आहे. पुरबाधित क्षेत्रातील ऊसाची उचल करण्यावर प्राधान्याने भर दिला जात असुन शेतकऱ्याना सर्वतोपरी सहकार्य हे कारखाना प्रशासनाकड़ून दिले जात आहे त्यांमुळे भागातील शेतकरी बंधुनी आपला ऊस हेमरस कारखान्याकडे पाठवावा असे म्हटले आहे.गेल्या दहा वर्ष्यात कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या साठी उत्पादन वाढीच्या विविध योजना ह्या राबविल्या असल्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज तसेच सीमा भागातून मोठ्यां प्रमाणावर ऊसाचा पुरवठा होत असुन कारखान्याने शेतकऱ्यांच्या मना मध्ये विश्वास निर्माण केला आहे. कारखान्याकड़े नोंदित क्षेत्रानुसार चालु वर्षी जवळ पास साडे सात लाख टन ऊसाचे गाळप होईल असे सांगताना यापूढे गाळप ऊसाचे बील ऊस पुरवठा केलेल्या दर दहा दिवसाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे प्रसिद्धीला दिले आहे.
चंदगड तालुक्यातील ओलम शुगर्स (हेमरस) साखर कारखान्याकडून एफ. आर. पी. प्रमाणे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहीती ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी दिली. हेमरस तथा ओलम अँग्रो प्रा. लि. कडून ३१डिसेंबर २०१९अखेर पर्यंत गाळप केलेल्या उसाचे एफ. आर. पी. नुसार होणारे बिल संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. आतापर्यंत कारखान्याकडून २,६६,८६० मे.टन उस गाळप करण्यात आला आहे. ११:५४ रिकव्हरी आहे. भागातील शेतकरी बंधुनी आपला ऊस हेमरस कारखान्याकडे पाठवावा. यापूढे गाळप उसाचे बील दर दहा दिवसानी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे श्री. कुंडल यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment