![]() |
मल्लीकार्जून मुगेरी |
भारतीय जनता पार्टी चंदगड तालुका अध्यक्षपदी मल्लीकार्जून मुगेरी यांची एकमताने निवड करण्यात
आली. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष निवड ही
तीन वर्षातून एकदा केली जाते. याजागी नामदेव पाटील यांची निवड झाली होती. यांची मुदत जानेवारी 2019 ला संपणार होती. मात्र निवडणुक असल्यामुळे एक वर्षे वाढ दिली होती. निवडीचा कार्यकाल संपल्यामुळे नवीन तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आला.
![]() |
चंदगड येथील भाजप कार्यालयात तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्कार स्विकरताना मल्लीकार्जून मुगेरी |
यावेळी भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, मावळते अध्यक्ष नामदेव पाटील, माजी पंचायत समिती सभापती शांताराम पाटील, समीर पिळणकर यांच्यासह नूतन नगरसेवक दिलीप महादेव चंदगडकर, नुरजहा अब्दुलरहीम नाईकवाडी, सचिन निंगाप्पा नेसरीकर, प्रमिला परशराम गावडे, संजना संदिप कोकरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment