सीमाकवी रवींद्र पाटील यांना "राज्यस्तरीय जनमत आदर्श शिक्षक पुरस्कार " जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2020

सीमाकवी रवींद्र पाटील यांना "राज्यस्तरीय जनमत आदर्श शिक्षक पुरस्कार " जाहीर

रविंद्र पाटील
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर येथे जनमत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन २०१९ -२० च्या गौरव कर्तृत्वान व्यक्तीचा या  राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये  सीमाकवी रवींद्र पाटील यांना "राज्यस्तरीय जनमत आदर्श शिक्षक पुरस्कार" जाहीर झाला आहे. 
मंगळवार ७ जानेवारी २०२० रोजी शाहू स्मारक , दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील , महापौर सुरमंजिरी लाटकर, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, मुख्य संपादक महादेव नरूटे यांच्याहस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी येथे मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत आहेत. मूळचे कुद्रेमानी ता. जि. बेळगांव येथील असून सीमाकवी, पत्रकार, उत्कृष्ट निवेदक  म्हणून रवींद्र पाटील यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
२०१८च्या बडोदा ( गुजरात ) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात लढा ही सीमावासीयांच्या वेदना मांडणारी कविता सादर करून श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.आदय क्रांतिवीर  उमाजी नाईक साहित्य संमेलनात * काव्य कला गौरव पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला. आचार्य अत्रे साहित्य संमेलन , सासवड ( पूणे ),  बेळगुंदी येथील कवी संमेलनात कवी म्हणून सहभागी झाले होते. नसरापूर येथे पूणे विद्यापिठ मार्फत कवितेचे बदलते स्वरूप राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग. मूळात साहित्याची आवड असल्याकारणाने त्याच्यावर अखिल भारतीय साहित्य परिषद कर्नाटक राज्यध्यक्ष पदावर निवड झाली आहे. या परिषदेमार्फत बेळगाव येथे राज्यस्तरीय कवी संमेलन भर वून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. 
पत्रकार रवींद्र पाटील हे  पत्रकार असून सकारात्मक बातम्या पत्रकारीता  डीजीटल दुनियेत स्वतःला सिद्ध केले आहे. दै.जनमत चंदगड प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. बेळगाव येथे लग्नकल्लोळ , प्रेमाची पैज या नाटकांचे नाट्य रसिंकासाठी मोफत आयोजन केले होते. शिवसंदेश भारतच्या माध्यमातून पाटील यांनी गडकिल्त्यांच्या संवर्धनाबरोबरच सामाजिक कार्याचा वसा चालवला आहे.३१ डिसेंबर २०१९ रोजी महिपाळगडावर शिवचिंतन व जागर असा अनोखा उपक्रमाचे संयोजन केले. त्यांना २०१८ साली कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा कोजिम प्रेरणा पुरस्कार तर चंदगड येथील २०१९ साली राजा शिवछत्रपती पारगड सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. 
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे समन्वयक , साहित्यरत्न ग्रुपचे व कुद्रेमानी बलभीम साहित्य संघाचे  सदस्य म्हणून विविध उपक्रमात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. अशा शैक्षणिक , सामाजिक , कला - क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात व सीमा चळवळीत हिरिरीने सहभाग या धडपडी, कार्यतत्पर व  क्रीयाशील शिक्षकाला "राज्यस्तरीय जनमत आदर्श शिक्षक पुरस्कार " जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment