|
कोवाड - कागणी रोवडवर वृक्षांना आगी लावण्याच्या प्रकारामुळे वृक्षांवर सक्रांत येत आहे. |
संजय पाटील / कोवाड प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कोवाड-उचगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना आगी लावण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली,असून जाणीवपूर्वक आगी लावणार्या समाजकंटकावर वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरीक व निसर्गप्रेमीतून होत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करुन कोटीच्या कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे.वृक्षलागवडी मूळे पाऊसमान वाढते व पॄथ्वीचे वाढणारे तापमान कमी होते,याबाबत जगद्गुरु तुकोबांनीही अभंगाद्वारे "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे,पक्षी हि सुस्वरे आळविती" असे वृक्ष व , निसर्गाविषयी वर्णन केले आहे, काव्यातून चित्रित झालेला रम्य निसर्ग आजच्या घडीला मात्र मानवाच्या स्वार्थीपणामुळे भकास होताना दिसत आहे.
|
आगीमुळे जळत असलेली रस्त्याकडेची झाडे |
चंदगड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला विविध प्रकारची झाडे वनविभाग,सामाजिक वनीकरण विभागाने लावली आहेत आहेत. कोवाड-बेळगाव मार्गावरील चंदगड तालुक्यातील हद्दीत होसुर पासून ते कोवाड पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा निलगिरी,सिसम,आकेशी,बाभूळ,जांभूळ,निलगिर आदी जातींची झाडे लावण्यात आली आहेत.या झाडांमुळे एक प्रकारे कर्यात भागाला वेगळेपण प्राप्त झाले आहे. झाडांमुळे निसर्गात भर पडली आहे असं म्हणने चुकीचे ठरणार नाही,या मार्गावरून ये जा करणाऱ्याचे जणू हि झाडे स्वागतच करतात असे भासते.सद्यस्थीतीत रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारच्या झाडावरील पक्षी,प्राण्यांना आता या ठिकाणी राहणे देखील कठीण झाले आहे,कारण झाडाच्या बुंध्याला आग लावण्याच्या प्रकारात दिवसेदिवस वाढ होत आहे.त्यामुळे झाडांचे जीवन धोक्यात आले आहे.
दरवर्षी या मार्गावरील मोठ्या प्रमाणात झाडे आगी लावून नष्ट केली जातात. मागील वर्षी सुध्या याच कालावधीत असा प्रकार सर्व प्रथम चंदगड लाईव्ह न्युज ने समाजासमोर आणला होता ,त्यानंतर पुन्हा काही दिवस या सर्व गोष्ट्टीना आळा बसला होता.झाडे वाढवा,झाडे जगवा अश्या अनेक मोहिमा सरकारी पातळीवर राबविल्या जातात,पण एखादी गोष्ट राबविण्यातच अनेकदा तीच अपयश दडलेल असत ,सार्वजनिक बांधकाम मात्र या सर्वांकडे गांभीर्याने पाहात नाही,त्यामुळे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी देखील कोणी पुढे येत नाही.एखादं झाड लावण्याची आणि त्याच अपत्य वत संगोपन करण्याची वृत्ती जागविणे हीच आजची गरज असल्याचे यावरून दिसून येते. प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे आपल्या बरोबर झाडे,वनस्पती त्यावर वाढणारे पशु,पक्षी देखील निसर्गाचा एक घटक आहे.झाडांच्या होत असलेल्या हानी मुळे या रस्त्याचे महत्व देखील कमी होत आहे.एकेकाळी या रस्त्याने जाताना दुतर्फा असणाऱ्या गर्द झाडांच्या सावलीमुळे भर उन्हातही प्रवास सुखाचा व्हायचा.मात्र दिवसे दिवस झाडांना आग लावण्याच्या प्रकारामुळे रस्त्याला भकासपना येऊ लागला आहे.तर आगी लागून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील असलेली ही झाडे कोणत्याही क्षणी पडून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना इजा होण्याची दाट शक्यता आहे, अशी किती तरी झाडे हि आजमितीस धोकादायक स्थितीत आहेत,दिवसागणिक ती वाळत चाललेली आहेत.त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी त्यांचा बंदोबस्त करण्याची दखल हि संबधित विभागाने घेणे गरजेचे आहे.त्याबरोबरच अश्या झाडांना आगी लावण्याच्या प्रकारांना कश्या प्रकारे आळा बसेल या कडेही बघायला हवे,अशी मागणी या भागातील निसर्ग प्रेमीतून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment