कराड येथे अभिनेते विलास रकटे, आम. आनंदराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते 'राज्यस्तरीय शिक्षक रत्न' पुरस्कार सपत्नीक स्वीकारताना श्रीकांत पाटील. |
चंदगड / प्रतिनिधी
शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या कार्यातील बहुमूल्य योगदानाबद्दल कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र व केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था वाळवा, जि. सांगलीचा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे वितरण नुकतेच कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात सिनेअभिनेते विलास रकटे, आ. बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. विश्वास सायनाकर यांच्या हस्ते; सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, कराडच्या नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, महिला अन्याय निवारण कृती समिती कोल्हापूर जिल्हाध्यक्षा अॅड. नीता मगदूम, अंतरराष्ट्रीय क्रीडापटू शिवराज मगदूम, गणेश कुंभार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
एक चतुरस्त्र, अष्टपैलू, विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षक तसेच उत्कृष्ट प्रशासक म्हणून ते सुपरिचित आहेत. देशाची सुदृढ भावी पिढी निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या सेवाकाळात शेकडो संस्कारक्षम विद्यार्थी घडवले आहेत. या सर्वांची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. पाटील यांना यापूर्वी राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन चा राज्यस्तरीय 'महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार' तसेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा 'राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले' राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment