गावा-गावात शिवविचार पोहचवण्याचे आदर्श कार्य
![]() |
प्रा. मधुकर जाधव |
चंदगड / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आपणाला मार्गदर्शक आहेत .त्यांच्या विचाराचा वसा व वारसा घेऊन पूढे मार्गस्थ झाल्यास संबंध मानव जातीचे कल्याण झाल्या शिवाय राहणार नाही .असे विचार इतिहास व्याख्याते प्रा मधूकर जाधव यानी केले. डुक्करवाडी (रामपूर) येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच राजू शिवनगेकर होते.
स्वागत विलास नाईक यानी केले. प्रा.जाधव पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला राष्ट्रीय ध्येय होते . छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण विषयक धोरण कांतिकारी होते . छत्रपतींच्या स्वराज्याची राज्यघटना होती . स्वराज्याची लष्करी सेना भारतातील पहिली राष्ट्रीय सेना होती . धार्मिक सहिष्णुता हा त्यांचा सर्वश्रेष्ठ गुण होता छ . शिवाजी महाराजांनी मानवतावादाला सर्वश्रेष्ठ स्थान दिले . जगातील अनेक देश छत्रपतींचे विचार आपल्या शासन व्यस्थेमध्ये समाविष्ट करून पुढे जाताना दिसत आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्या आणि कला यांना नेहमीच प्रोत्साहन दिले . शाहीर , कलावंत , विन्दवान , ग्रंथकार , कवी , लेखक , यांच्याकडे महाराजांचे पूर्ण लक्ष असे . स्वराज्याच्या माध्यमातुन आदर्श शासन व्यवस्था निर्माण केली . छत्रपतींची अर्थनिती जगात सर्वश्रेष्ठ होती . शेतकरी हाच स्वराज्याचा आत्मा होता . स्वराज्याचा स्वतंत्र असा अर्थसंकल्प होता . भारतातील सागरी सत्तेचा पाया छ . शिवाजी महाराजांनी घातला . छत्रपती शिवाजी महाराज स्वत : वास्तु विशारद म्हणजे उत्तम इंजनियर होते . त्यांनी स्त्री ला देवतेचे स्थान दिले . हे छत्रपतींचे अलौकीक विचार समाजाने आचरणात आणण्याची गरज आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले . छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव नीतीमत्ता , चारित्र्य व चांगली वागणूक याच मूल्यांना महत्त्व दिले . आजच्या युवकांमध्ये छत्रपतींचे विचार रूजले पाहिजेत . छत्रपतींचे शेतकरी कल्याणकारी धोरण , सामाजिक समता , अध्दश्रध्देला विरोध , मानवी हक्क , स्त्री - पुरूष समानता , व्यक्ति स्वातंत्र्य , आर्थिक विकास , उद्योगाची वाढ, आरमाराची प्रगती, न्यायव्यवस्था, मंत्रीमंडळाची निर्मिती, चलनव्यवस्था, दळणवळण व्यवस्था , जलव्यवस्थापन, लोक शिक्षण , गनिमीकावा , संरक्षण विषयक धोरण , विज्ञाननिष्ठता आदि . पैलुंवर आपल्या व्याख्यानातुन प्रकाश टाकला.
सदस्य आर व्ही ढेरे ,विलास नाईक,रघूनाथ गावडे,जायाना वर्पे,श्रीधर गावडे,नंदकुमार तूर्केवाडकर, सूनिल देशपांडे, धैर्यशील यादव,संजय सूतार आदीसह ग्रामस्थ, शिवराजमुद्रा मंडळाचे पदाधीकारी उपस्थित होते.हडलगे,दाटे,जटटेवाडी येथेही प्रा जाधव यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.या ठिकाणीही प्रतिसाद मिळाला हडलगे येथे सरपंच सौ लता पाटील , उपसरपंच , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य , गावातील शिवप्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते स्त्री - पुरूष मोठया प्रमाणात उपस्थित होते .दाटे येथे शिवगर्जना मंडळाचे व शिवजंयती उत्सव समितीचे रवि कांबळे व गावातील लष्करी जवान व विविध संस्था पदाधीकारी , स्त्री - पुरूष मोठया प्रमाणात हाजर होते . जटटेवाडीचे सरपंच प्रा . पी . डी पाटील सर , शिवप्रेमी व पांढरदेवी मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment