पारगड-मोर्ले रस्त्याच्या कामासाठी पारगड किल्ला संयुक्त विकास समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकामसमोर उपोषण केले जात आहे. |
पारगड- मोर्ले रस्त्याचे बंद पडलेले काम पून्हा सूरू करावे या मागणीसाठी आज पंचक्रोशी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमूदत उपोषणाला सूरवात करण्यात आली आहे. रस्त्यावर जोपर्यंत मशिनरी जाऊन कामाला प्रत्यक्ष सूरवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार उपोषण कर्त्यानी घेतला आहे. या रस्त्याचे काम गेली 2वर्षे वन विभाग व बांधकाम विभागाच्या भोंगळ व बेजबाबदार पणामुळे बंद आहे, 2018 मध्ये या रस्त्याच्या कामाला सूरवात झाली आहे. पण मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक विभाग)कोल्हापुर या कार्यालयाकडून झाडे तोडुन रस्ता करणे संबधीचा आदेश आसुन सुद्धा कोल्हापूर उपवनविभाग जाणीवपुर्वक टाळाटाळ करत आहे,या रस्त्याचे काम तातडीने सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आसा इशारा कृती समितीचे अध्यक्ष रघूवीर शेलार यानी दिला आहे
दरम्यान उपवाभागिय बांधकाम अभियंता संजय सासणे व चंदगड विभागाचे वनक्षेत्रपाल डी जी राक्षे यांची भेट घेऊन उपोषण कर्त्यांचा वरिष्ठाशी संपर्क साधून देत होते. पारगडचे माजी सरपंच विद्याधर बाणे,प्रदीप नाईक ,बुधाजी पोवार ,संतोष पोवार ,चंद्रकांत पवार ,रमावती नाईक,आत्माराम बाणे ,देवीदास पवार, अरविंद पवार,महादेव पवार,गोपाळ पवार,मनोहर पवार आदीसह पारगड,मिरवेल, मोर्ले,पाळये येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.
पारगड ते मोर्ले रस्त्यामध्थे जाणार्या जमिनीच्या बदल्यात वन विभागाला तेव्हढीच जवळपास 51 एक्कर जमिन शाहूवाडी तालूक्यातील गजापूर गावी दिली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नविन विनाकारणासाठी लागणारी दिड कोटी रक्कम वनविभागाकडे भरली आहे.तरी सुध्दा कोल्हापूर वनविभागाने अद्याप परवानगी दिली नाही. शाहूवाडी तहसिलदार याना जमिन मोजून देण्याविषयी पत्र पाटवून व प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. संजय सासणे (उपअभियंता, बांधकाम, उपविभाग, चंदगड)
No comments:
Post a Comment