पारगड-मोर्ले रस्त्याप्रश्नी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2020

पारगड-मोर्ले रस्त्याप्रश्नी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी

पारगड-मोर्ले रस्त्यासाठी चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेला उपोषणकर्ते रघुवीर शेलार यांच्या प्रकृतीची तपासणी करताना डॉ. आर. के. खोत. शेजारी अन्य उपोषणकर्ते. 
चंदगड / प्रतिनिधी
पारगड- मोर्ले रस्त्याचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमूदत उपोषण आज दुसऱ्या दिवशीही आंदोलनकर्त्यांचे उपोषण सुरुच आहे. रस्त्यावर जोपर्यंत मशिनरी जाऊन कामाला प्रत्यक्ष सुरवात होत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांचा आहे. आज दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्यात आली.
दरम्यान आज पुन्हा बांधकाम उपअभियंता संजय सासणे यांनी उपोषणकर्यांची भेट घेवून वनविभागाला दिलेले पत्र उपोषणकर्यांना दिले. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या पत्राच्या अधिन राहून आम्ही 4 मार्च 2020 पासून प्रत्यक्ष काम सुरु करत आहोत. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्या 3 मार्च 2020 पर्यंत आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्हाला लेखी कळवावे. अशा आशयाचे पत्र बांधकाम विभागाच्या वतीने चंदगड वनविभागाला दिले आहे. 
दरम्यान या उपोषणकर्त्यांची प्रकृतीची डॉक्टरमार्फत तपासणी करावी अशी मागणी उपअभियंता संजय सासणे यांनी दुरध्वनीवरुन केली. मात्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी हा विषय आमच्या अखत्यारीत नसल्याचे सांगून तो मागणी धुडकावून लावली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून हकीकत सांगितली. यावेळी डॉ. खोत यांनी आपल्या टीमसह येवून उपोषणकर्त्यांची प्रकृती तपासली. यामध्ये रघुवीर शेलार यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णांलयात दाखल करण्याची गरज आहे. तर अन्य तिघांचा रक्तदाब कमी झाल्याचे डॉ. खोत यांनी सांगितले. पारगडचे माजी सरपंच विद्याधर बाणे, प्रदीप नाईक, बुधाजी पोवार, संतोष पोवार, चंद्रकांत पवार, रमावती नाईक, आत्माराम बाणे, देवीदास पवार, अरविंद पवार, महादेव पवार, गोपाळ पवार, मनोहर पवार आदीसह पारगड, मिरवेल, मोर्ले, पाळये येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. उपोषणस्थळी तालुक्यातील विविध स्तरातील मान्यवरांनी भेट देवून पाठींबा दर्शविला. 

No comments:

Post a Comment