चंदगड लाईव्हच्या वृत्ताची दखल, जळीत झाडांच्या ठिकाणाला शाखा अभियंता यांनी दिली भेट, संबंधितांना सुचना देणार, प्रसंगी कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2020

चंदगड लाईव्हच्या वृत्ताची दखल, जळीत झाडांच्या ठिकाणाला शाखा अभियंता यांनी दिली भेट, संबंधितांना सुचना देणार, प्रसंगी कारवाई

कोवाड / प्रतिनिधी
चंदगड तालुका हा निर्गसंपन्नतेने नटला आहे. अनेक ठिकाणी या निसर्ग संपन्नतेला बाधा आणण्याचे प्रकार हे वारंवार घडताना दिसत आहेत. चंदगड तालुक्यातील कोवाड -उचगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना गेल्या काही दिवसांपूर्वी आग लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे काही झाडे ही आगीच्या भक्षस्थानी पडून अर्धवट जळालेल्या अवस्थेत धोकादायक स्थितीत आहेत. याबाबत चंदगड लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत या मार्गावरील झाडांची सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडचे उपअभियंता संजय सासणे यांच्या सांगण्यावरुन शाखा अभियंता प्रशांत गिरी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी आज भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचे वृत्त हे काल चंदगड लाईव्ह न्युजने प्रसारीत केले होते. त्याची तात्काळ दखल घेत आज ही पाहणी करून सविस्तर परिस्थितीचा आढावा घेतला. असे प्रकार हे वारंवार होत असून त्यामुळे वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या सर्व प्रकारावर आळा बसावा. यासाठी रस्त्यालगतच्या संबंधित शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात सूुचना देऊन प्रसंगी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी शाखा अभियंता प्रशांत गिरी हे उपस्थित होते. सदर घटनेची तात्काळ दखल घेतल्यामुळे ग्रामस्थातून आणि निसर्गप्रेमीतुन समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment