![]() |
दहावी परिक्षेपूर्वी काॅपी करणार नसल्याची शपथ घेताना विद्यार्थ्यी. |
ग्रामीण भागात इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पालकांसह विद्यार्थी हजर झाले होते. भविष्याला नवीन वळण देणाऱ्या या परीक्षेकडे, आजच्या स्पर्धात्मक युगात आपण अत्यंत गांभीर्याने पाहतो. यासाठी या परीक्षेकडे पहिले जातं . चंदगड तालुक्यात 8 परीक्षा केंद्रावर एकूण 1784 विद्यार्थी आज मराठीच्या पेपरला प्रविष्ट झाले अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सौ. सुमन सुभेदार यांनी दिली. सुरुवातीला सकाळी कॉपी विरहित परीक्षा केंद्र चालण्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडून शपथविधी घेण्यात आली. त्यानंतर शारीरिक तपासणी करून विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्रांमध्ये सोडण्यात आले. पायातील चपला, कमरेतील बेल्ट आधी वस्तू बाहेर ठेवून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. तालुक्यात सर्वत्र आज शांततेत परीक्षा पार पडली.
No comments:
Post a Comment