कोवाड / प्रतिनिधी
येथील श्रीराम विद्यालयात जागतिक मराठी भाषा दिवस साजरा झाला. मुख्याध्यापक ए.एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा.एम.बी. नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. एस.पी. पाटील यांनी स्वागत केले. प्रा.एम.व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषा व संस्कृतीचे महत्त्व सांगून प्रा.एस.एच. पाटील यांनी मराठी भाषा ही आपली भाषा आहे. या भाषेने मानवी जीवन समृद्ध केले आहे. मराठीचे संवर्धन व्हावे यासाठी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगावा असे आवाहन करुन यांनी मराठी नाटक व कवितांची माहिती दिली. संतोष शारबिद्रे, पर्यवेक्षक एन.एम. मनगुतकर यांनी कविता सादर केल्या. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस. डी. सावंत, एस.एस. पाटील, सुनिल हल्याळी, प्रा.एस.टी. कदम, प्रा.एस.एम. माने उपस्थित होते. एस.पी. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा.एम.एल. पाटील यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment