तेऊरवाडी / प्रतिनिधी
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पुन्हा एकदा पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याने विवेक दत्तू नाईक व पर्श सन्नापा नाईक हे दोघेजन जखमी झाले .तात्काळ नेसरी येथील ग्रामिण रुग्णालयात या दोघावर उपचार करण्यात आले . या घटनेने परिसरातील गावातून शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मूलामध्ये घबराट निर्माण झाली आहे .
गेल्या सहा महिण्यापासून नेसरीमध्ये प्रचंड प्रमाणात मोकाट कुत्र्यांची वाढ झाली आहे .आतापर्यंत यापूर्वी २६ जनाना अशा मोकाट कुत्र्यांनी चावले आहे . पुन्हा या कुत्र्यानी दहशत निर्माण केल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . नेसरी - कोवाड मार्गावर खिश्यन स्मशानभूमिजवळ नेसरी तील चिकन सेंटर चालक कोंबडीची उरलेली सर्व घाण उघडयावरच फेकून देत आहेत . रस्त्याकडे लाच ही घाण टाकली जात असल्याने येथे जवळपास 2५ मोकाट कुत्र्यांचा वावर चालू आहे . त्यामूळे येथून चालत जाणाऱ्या तोरवाडी येथील शालेय मुलांना याचा प्रचंड त्रास होत आहे. नेसरी ग्रामपंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नेसरी ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment