चंदगड / प्रतिनिधी
पत्नीशी पटत नसल्याने घटोस्फोटासाठी कोर्टात केस सुरु आहे. या कारणास्तव मानसिक तणावाखाली असलेल्या सुनिल रामचंद्र पाटील (वय-33, रा. जट्टेवाडी, ता. चंदगड) यांनी विषारी औधष प्राशन केले. बेळगाव येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. 2) रात्री दहा वाजता ते मयत झाले.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - पत्नीशी वारंवार वाद होत असल्याने सुनिल त्याच्या पत्नी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला आहे. या कारणावरुन सुनिल हा मानसिक तणावाखाली होता. याच नैराश्येतून सुनिलने रविवारी (ता. 1) विषारी औषध प्राशन केले होते. यामुळे त्याच्यावर बेळगाव येथील रुग्णांलयात उपचार सुरु होते. तेथे उपचार सुरु असताना सोमवारी (ता. 2) रात्री त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. याबाबतची वर्दी सागर पाटील यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
No comments:
Post a Comment