पिकावर मारण्यासाठीचे विषारी औषध प्यायल्याने ढेकोळीवाडीतील महिलेचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2020

पिकावर मारण्यासाठीचे विषारी औषध प्यायल्याने ढेकोळीवाडीतील महिलेचा मृत्यू


चंदगड / प्रतिनिधी
ढेकोळीवाडी (ता. चंदगड) येथील सौ. रेणुका शिवाजी पाटील (वय-43, रा. ढेकोळेवाडी, चंदगड) यांचा खोकल्याचे औषध समजून पिकांचे तणावर मारणेचे औषध प्यायल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी आठच्या दरम्यान हि घटना घडली. निंगोजी पाटील यांनी याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली. 
यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली  माहीती अशी – सौ. रेणुका पाटील यांना खोकल्याचा त्रास सुरु होता. यावेळी त्यांनी 24 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी तीन वाजता नजर चुकीने औषध समजून घरातील कोणतेतरी पिकांचे तणावर मारणेचे विषारी औषध प्याले. त्रास जाणवू लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर बेळगाव येथील सीव्हील रुग्णांलयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना सोमवारी सकाळी आठच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. हे. कॅ. श्री. कसेकर तपास करत आहेत. 


No comments:

Post a Comment