![]() |
पांडुरंग कुंभार |
कोवाड (ता. चंदगड) येथील स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडुरंग कुंभार (वय-८१) यांचे आज राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज मंगळवार (ता. ४) रोजी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. निधनाची बातमी समजताच कोल्हापूर, बेळगांव येथील साहित्य क्षेत्रातील साहित्यप्रेमीं लोकांनी हजेरी लावून अत्यंदर्शन घेतले.
सन १९५८ पासून पांडूरंग कुंभार स्वामीकार रणजित देसाई यांच्या संपर्कात आले. त्यांच्या रेखीव व वळणदार अक्षरानी रणजितदादा भारावून गेले. त्यामुळे अल्पावधित त्यांची दादांचे लेखनिक म्हणुन जगभर ओळख निर्माण झाली. त्यांच्या रेखीव अक्षरांच्या हस्तलिखीतांची अनेक प्रकाशकानाही भुरळ पडली होती. आपल्या लेखनिकासाठी दादांनी तीन पुस्तकांच्या अर्पण पत्रिका लिहिल्या होत्या. यावरुन स्वामीकारांचे त्याच्यावरील अलोट प्रेम दिसून येते. 'स्वामी ' कादंबरीच्या लेखनिला सुरवात झाली आणि कुंभार यांना शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली. तेरणी गावात ते रुजू झाले. नोकरी सांभाळत गुरुजीनी दादांनी लिहिलेल्या साहित्याला आकार दिला. दादांच्या कादंबऱ्यांचे लिखान करताना गुरुजींच्यात लपलेला साहित्यिक जागा झाला. त्यामुळे "वाळवण" हा त्यांचा पहिला कथासंग्रह तयार झाला. कथासंग्रहात अडकून न बसता गुरुजीनी कादंबरीचे लिखान करायला सुरवात केली. त्यामुळे ग्रामिण साहित्याचा बाज असलेली ' गावकुस ' ही कादंबरी त्यांनी पूर्ण केली. आतापर्यंत गुरुजीचे चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, तीन संपादीत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. १९९८ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी अनेक साहित्यनिर्मिती केली. दरवर्षी दिवळी अंकातून त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. स्वामीकार रणजितदादा सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यात त्याचे मोठे योगदान होते. वाचनालयाचे ते सल्लागार म्हणून काम पाहत होते. चंदगड तालुका साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष होते. बेळगांव येथे प्रकाशित झालेल्या ' ज्वाला` या दिवाळी अंकाचे ते अनेक वर्षे सहसंपादक होते. दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment