![]() |
भरत कुंडल |
यावर्षी अतिवृष्टी आणि महापूराचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो म्हणजे शेतकरी राजाला,कारण इतर प्रमुख पिकाबरोबरच खास करून राज्यातील नगदी पी क म्हणून ओळखले जाणारे ऊस पीक हे जवळपास 10 ते 12 दिवस पाण्याखाली असल्यामुळे ऊसाच्या वाढीवर आणि उत्पादनावर प्रत्यक्ष परीणाम दिसत होता त्यातच पुरामुळे उद्धवस्त झालेल्या रस्त्यामूळे त्यांना ऊसाची उचल वेळेवर करण्याची खरी परीक्षा हि ऊस उत्पादका बरोबरच कारखान्याची सुध्या होती त्यामुळे त्यांना सर्वतोपरी सहकार्य होणे गरजेचे होते.अश्या परिस्थितीत गेली 10 वर्ष चंदगड,आजरा,गडहिंग्लज बरोबरच सीमा भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला हेमरस या नावाने ओळखला जाणारा ओलम अॅग्रो प्रा.लि.हा कारखाना यशस्वीरित्या यावर्षीचा 10 वा गळीत हंगाम पूर्ण करण्याच्या मार्गावर असून गेली 6 वर्षे पासून भरत कुंडल बुझीनेस हेड ची धुरा समर्थपणे पार पाडत आहेत.यावर्षीच्या पावसाने खऱ्या अर्थाने जरी शेतकऱयांच्या डोळ्यातून पाणी काढले असले तरी त्यातून ओलम ऍग्रो हा साखर कारखाना या सर्व परिस्थितीत शेतकरयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला,मग पूरग्रस्त ऊसाची वेळेवर उचल करण्याच्या बाबतीत असो,उचल उसाची बिले शेतक रयांच्या खात्यावर जमा करण्या च्या बाबतीत असो किंवा उभ्या ऊसावर गरजू शेतकऱ्याना ऍडव्हान्स स्वरूपात आगाऊ रक्कम देण्याबाबत असो प्रत्येक वेळी कारखान्याने शेतक-यांच्या प्रति असलेली सामाजिक बांधिलकी जपली आहे.हेमरस तथा ओलम अँग्रो प्रा. लि. कडून 10 फेब्रुवारी 2020 अखेर पर्यंत गाळप केलेल्या ऊसाचे होणारे बील संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या आधीच जमा केले आहे. 11 तारखे नंतर ची पुढील बिले हि दर दहा दिवसांनी संबंधित खातेदाराच्या बँक खात्यावर जमा करत असल्याचे म्हटले आहे.तसेच अतिवृष्टी आणि पुरस्थिती लक्षात घेऊन 11 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी पर्यंत च्या ऊसाला प्रतीटन 2900/ रु आणि 1 मार्च नंतर च्या ऊसाला प्रति टन 2920/रु दर दिला जाईल त्या बरोबरच आतापर्यंत चालू गळीत हंगामात 03/03/2020 अखेर एकुन 114 दिवसात कारखान्याकडून 6,02,290 मे.टन उस गाळप करण्यात आला असून एकूण साखरेचे उत्पादन हे 7,60,040 क्विंटल झाले असून एकूण 12.85 % रिकव्हरी आहे. पुरबाधित क्षेत्रातील ऊसाची उचल करण्यावर भर दिला असून कारखान्याकड़े नोंदित क्षेत्रानुसार चालु वर्षी जवळ पास साडे सात लाख टन ऊसाचे गाळप होईल असे सांगताना यापूढे गाळप ऊसाचे बील ऊस पुरवठा केलेल्या दर दहा दिवसाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल असे प्रसिद्धीला दिले आहे.
No comments:
Post a Comment