अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2020

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार

अडकूर (ता. चंदगड) येथील रुग्णांलयाला उत्कृष्ठ रूग्णांलय डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार देताना जि. प. कोल्हापूरचे अध्यक्ष बजरंग पाटील, प्रा. आ. केंद्र अडकूरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, श्री. शिरसागर आदी. 
अडकूर / प्रतिनिधी 
अडकूर (ता. चंदगड) येथील रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून उत्कृष्ठ रूग्णांलय म्हणुन डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
अडकूर परिसरातील जवळपास ४० हून अधिक खेडयामध्ये या प्राथमिक आरोंग्य केंद्रांकडून वैद्यकिय सेवा पुरवली जाते. या केंद्राचे वैदयकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ म्हणजे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा खरा आधार. डॉक्टर चोविस तास आरोग्य केंद्रात उपलब्ध असल्याने रोज जवळपास २०० पेशंन्ट तपासून त्यांच्यावर उपचार केले जातात. यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. पुरुष, स्त्री नसबंदी मध्ये तर डॉ. सोमजाळ यांचा हातखंडा आहे. महापुराच्या कालावधितही डॉ. सोमजाळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिवस-रात्र वैदयकिय सेवा पुरवली होती. इमारतीला सवत्र गळती लागली असताना आणि खाली पाणी असतानाही प्लास्टीक कागद बांधून रुग्णाना सेवा देण्याचे काम चालूच होते. सरकारच्या विविध लसिकरण मोहिमा, विविध प्रशिक्षणे डॉ. सोमजाळ यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य केंद्राने पूर्ण केल्या असल्याने निश्चितच हा मिळालेला पुरस्कार म्हणजे येथील वैदयकिय अधिकारी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणावा लागेल. काल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते डॉ. सोमजाळ व येथील सर्व कर्मचारी वर्गाने हा पुरस्कार स्विकारला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भाऊसाहेब कम्पी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉं. योगेश साळे, जिल्हा परिषद  सदस्य सचिन बल्लाळ आदी मान्यवर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment