विद्यार्थ्याना आव्हानेच सक्षम व अनुभवी बनवितात - न्यायाधिश बिराजदार - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2020

विद्यार्थ्याना आव्हानेच सक्षम व अनुभवी बनवितात - न्यायाधिश बिराजदार

कोवाड महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न
कोवाड : येथील कोवाड महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात मार्गदर्शन करताना चंदगडचे न्यायाधिश ए . सी . बिराजदार व इतर.
कोवाड / प्रतिनिधी
पदवी मिळविली म्हणजे आपण फार मोठे नाही. तर पदवीमुळे विकासाच्या आणि उपजिविकेच्या वाटा खुल्या होतात. ज्या शिक्षणाने माणूस घडतो तेच खरे शिक्षण असते. आजच्या विद्यार्थ्यांच्यासमोर खुप मोठी आव्हाने आहेत. पण हीच आव्हाने विद्यार्थ्यांना सक्षम व अनुभवी बनवितात असे मत चंदगड न्यायालयाचे न्यायाधिश ए. सी. बिराजदार यांनी व्यक्त केले.
पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान करताना चंदगडचे न्यायाधिश ए. सी. बिराजदार व इतर मान्यवर.
कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ झाला. त्यावेळी न्यायाधिश बिराजदार बोलत होते. अध्यक्षस्थांनी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे होते. शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. एस. डी. डेळेकर उपस्थित होते.
डॉ. व्ही. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. डी. कांबळे यांनी स्वागत केले. न्यायाधिश बिराजदार म्हणाले, " शिक्षणामुळे माणुस समृध्द होतो. त्यासाठी विद्याथ्यांनी उच्च शिक्षण घेण्यावर भर द्यावा. ज्याच्याकडे ज्ञान आहे. तोच या स्पर्धेच्या जगात यशस्वी होणार. शिक्षणाला गती  आल्याने ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. खुप मोठी आव्हाने आपल्या आयुष्यात येतात. त्यावर मात करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आव्हानेच माणसाला जगण्याचा अर्थ शिकवितात." डॉ. डेळेकर म्हणाले, "आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टीतून शिकता आले पाहिजे. म्हणून कोणतीही गोष्ट कमी समजू नका. त्यातून अर्थबोध घ्या. त्यामुळे आपल्याच ज्ञानात त्याची भर पडेल. अनुभवाची शिदोरी आपल्याकडे असेल तर यशाचे शिखर पार करता येते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सचिव एम. व्ही. पाटील,  बी. के. पाटील, सहसचिव शाहु फर्नाडीस, डॉ. पी. एस. पाटील, पी. सी. पाटील, गुंडू सावंत, याकूब मुल्ला, नरसिंग बाचूळकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मोहन घोळसे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. एस. एन. कांबळे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment