चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील तरुण मंडळ, गणेशोत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ, सर्व गावकामगार पोलीस पाटील, राजकीय कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक शुक्रवार 6 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजता तहसिल कार्यालयातील सभागृहात बोलविण्यात आल्याची माहिती पो. नि. सुनिल पाटील यांनी दिली. संवेदनशील घटनांमध्ये कायदा व सुव्यवस्था जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी कम्युनिटी पोलिसिंग संकल्पना राबवणे गरजेचे आहे. होळी, रंगपंचमी, धुलीवंदन, शिवजयंती उत्सवाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment