दौलत कारखाना लिज्ड युनिटला सेवा जेस्ठतेनुसार कामगारांना न्याय देण्यासाठी निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2020

दौलत कारखाना लिज्ड युनिटला सेवा जेस्ठतेनुसार कामगारांना न्याय देण्यासाठी निवेदन


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व शुगर संचलित दौलत साखर कारखान्यातील काही कामगारांनी आपली सेवा जेष्ठता डावलण्यात आली असून आपल्यावर अन्याय केला आहे. याबाबत योग्य न्याय मिळावा म्हणून प्रशासनाला दुसऱ्या वेळी आज निवेदन दिले. यावेळी कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
दौलत कारखान्यात आपण कीत्येक वर्षे प्रामाणिक पणे काम करत आहे. मात्र सद्याच्या प्रशासनाने कामगारांना सेवाज्येष्ठता नुसार ठेवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सेवाज्येष्ठता डावलून आम्हावर अन्याय केला आहे. याबाबत यापूर्वीही आम्ही रितसर विनंतीचे निवेदन दिले आहे. मात्र त्याचा विचार न करता प्रशासनाने आपल्यावर अन्याय केला आहे. तरी आपल्याला योग्य न्याय मिळावा असे निवेदन दौलत तथा अथर्व शुगर (हलकर्णी, ता. चंदगड) कारखान्याला दिले आहे. निवेदन देताना पांडुरंग बोकनुरकर, बाबू सरनोबत, संजय नाईक, राजाराम गावडे, मनोहर होसुरकर इत्यादी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment