बेकायदेशीर कुळ जमिन विक्रीबाबतचे बेमुदत धरणे आंदोलन तहसिलदारांच्या आश्वासनानंतर मागे - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2020

बेकायदेशीर कुळ जमिन विक्रीबाबतचे बेमुदत धरणे आंदोलन तहसिलदारांच्या आश्वासनानंतर मागे

चंदगड तहसिल कार्यालयामसोर बेकायदेशीर कुळ जमिन विक्रीबाबतचे बेमुदत धरणे आंदोलन तहसिलदारांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. धरण्याला बसलेले अनुसया भेंडुलकर व कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक व श्री. गोरल.
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्रीमती अनुसया मारुती भेंडुलकर यांनी पाटणे (ता. चंदगड) येथील जमिनीवर वडीलांची पीकपाण्याला नोंद असताना मालक श्रीधर नाडगौंडा यांनी आम्हा वारसांना न कळवता सदर जमीन परस्पर विकली. त्यामुळे अनुसया भेंडुलकर यांनी गेले दोन दिवस चंदगड तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. आज चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांची नेमणुक केली असून 15 दिवसांत चौकशी पुर्ण करण्याच्या सुचना दिल्याने आज हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. 
निवेदनावर म्हटले आहे की, पाटणे (ता. चंदगड) येथे या जमिनी संरक्षित कुळ म्हणून अनुसया मारुती भेंडूलकर यांचे आई-वडील 1942 सालापासून जमिनी कसत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर अनुसया यांची वहीवाट चालू झाली. त्यापैकी गट क्र. 256/2 मधील फक्त 1 एकर 20 गुंठे आईच्या नावे इतर हक्कात व पिक पाण्यावर नोंद आहे, असे असताना सध्याचे मालक श्रीधर गजानन नाडगौडा (रा. बेळगाव) यांनी आम्हाला न कळवता संमत्तीपत्र व कुळाना नोटीस न देता अशोक नागोजी पाटील (रा. कालकुंद्री) यांना स्थानिक एजंटामार्फत तलाठी सर्कल सबरजिस्टर स्टॅप रायटर यांना हाताशी धरुन विकली असून फेरपार क्र. 671 घातला आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे तलाठी, सर्कल, सबरजिस्टर, स्टॅम्प रायटर व इतर पदाधिकारी आणि जमिन मालक यांची तात्काळ चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा. यापुढे होणारे माझे आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी. 32 ग प्रमाणे मला जमिन हक्क मिळावा.`` यासाठी बुधवारपासून चंदगड तहसिलसमोर उपोषणाला बसले होते. मात्र आज तहसिलदार विनोद रणवरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसिलदार डी. एम. नांगरे यांची नेमणुक केली असून 15 दिवसांत चौकशी पुर्ण करण्याच्या सुचना दिल्याने आज हे बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. 


No comments:

Post a Comment