![]() |
विद्याताई तावडे |
संपत
पाटील, चंदगड
पुरुष
व स्त्री समान असल्याचे कायदाने सांगितले जाते. महिलांना पन्नास टक्के आरक्षण
मिळूनही आजही महिलांच्यावर दिवसेनदिवस होणार अन्याय पाहता खरच स्त्री-पुरुष समान
आहेत का?
असा प्रश्न पडते. विधवा, परितक्त्या व निराधार महिलांवरील अन्याय दिवसेनदिवस वाढत
आहे. काही महिला त्याला प्रतिकार तर काही अन्याय सहन करत कसेबसे जीवन जगत आहेत.
आपल्यावर संकट आले म्हणून घरी रडत न बसता स्वत: संघर्षातून संकटावर मात करत हजारो
महिलांचे संसार नव्याने फुलविणारी रणरागिणी चंदगड तालुक्यातील सदावरवाडी येथे
आहे. तिचे नाव आहे, विद्याताई मुकुंद तावडे.
चंदगड लाईव्ह न्युज, महिला दिन विशेष
परिस्थिती
मानसाला घडविते हे उदाहरण विद्या तावडे यांच्या बाबतीत योग्य ठरले आहे.
विद्याताईचे वयाच्या अठराव्या वर्षी लग्न झाले. मात्र अल्पावधीतच व्यसनाधीन
असलेल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या काही वर्षातच पती
गेल्याने मोठे संकट ओढवले. तरीही त्या खचून न जाता मुलासोबत त्यांनी जगण्यासाठी संघर्ष
सुरु केला. शंभर रुपये मानधनावर आरोग्य सेविकेची नोकरी मिळाल्यानंतर याच
माध्यमातून महिलांशी संपर्क वाढत गेला. त्याची महिलाविषयीची काम करण्याची जिद्द
पाहून महिला राजसत्ता संघटनेने त्यांना जिल्हा महिला संघटक पदाची जबाबदारी त्यांना
मिळाली. अहमदनगर येथे घेतलेल्या बचत गटाच्या ट्रेनिंग मधून त्यांनी प्रशिक्षणही
घेतले. पुणे येथील टिळक महाविद्यालयातून एम. एस. डब्ल्यू पदवी धारण केली. 3
जानेवारी 2007 मध्ये त्यांनी दिशा सामाजिक संस्थेची स्थापन केली. प्रशिक्षणाच्या
जोरावर बचत गटाच्या माध्यमातून 250 महिला
बचत गट तयार केले. हे करत असताना महिलांची होणारी परवड त्यांच्यावर होणारे
अत्याचार त्यांनी जवळून पाहिले. त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत कौटुंबिक
हिंसाचाराच्या 427 केसेस त्यांनी हाताळून त्या महिलांना योय
न्याय मिळवून दिला.
चंदगड लाईव्ह न्युज, महिला दिन विशेष
आपल्यावर
ज्या प्रमाणे परिस्थिती आली आहे, तशी इतरांच्यावर येवू नये. यासाठी
महिलांच्यामध्ये जनजागृती करुन तुटलेल्या घटस्फोटित महिलांचे संसार उभे केले. विधवा
परित्यक्ता निराधार अपंग आशा 1047 महिलांचा
रिसर्च केला. त्यातील कित्येक प्रश्न मार्गी लावले. 250 हून अधिक महिलांना पेन्शन सुरू केली. महिला
लैंगिक शोषण यावर चर्चासत्रे घेऊन महिला जागृती केली. विद्याताईंनी आपल्या जीवनात
सावित्रीबाई फुले यांना आपले प्रेरणास्थान मानले. त्यांच्या विचारांची गावागावात
पारायणे केली.
बचत
गटाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचे तर दलित समाजाचे गट तयार केले महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी दिशा
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चार वर्षापूर्वी महिला पतसंस्था स्थापन केली. बचत
गटाच्या माध्यमातून तीन कोटी मंजूर करून घेऊन त्याची वेळेत परडफेडही केली. दहा
गावात दारूबंदी केली. पाच पुर्नविवाह केले. राज्यात पहिले महिला साहित्य संमेलन
भरुन महिलांचे प्रश्न जगासमोर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महिलांसाठी बचत
गटामार्फत नाचणी नाचणी पापड व अन्य उत्पादने तयार केली. संकटे ही प्रत्येकाच्या
वाट्याला येत असतात. मात्र संकटात खचून न जाता स्वत:बरोबर इतरांनाही सोबत घेवून त्याची
प्रगती साधण्याचे मोठे काम विद्याताईंनी केले. त्याचे काय महिलांच्यासाठी आदर्शवत
आहे.
चंदगड लाईव्ह न्युज, महिला दिन विशेष
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम देण्यासाठी गृहउद्योग सुरु
केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाताला काम
देण्यासाठी मोठ्या उद्योगाची गरज आहे. यासाठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे
समाजातील सुज्ञ मंडळींनी पुढे येऊन यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जेणेकरुन
महिला स्वत:च्या
पायावर उभे राहतील.
No comments:
Post a Comment